15CA/15CB या फॉर्म्सच्या ई-फाईलिंगमध्ये सवलत

नवी दिल्ली 14 JUN 2021

आयकर कायदा-1961 नुसार 15CA/15CB हे फॉर्म्स आयकर खात्याला इलेक्ट्रॉनिकली सादर करणे बंधनकारक आहे. सध्याच्या पद्धतीत करदाते फॉर्म 15CA हा सनदी लेखापालाने दिलेल्या फॉर्म 15 CB प्रमाणपत्रासह किंवा जसे लागू असेल तसे ई-फाईलिंग पोर्टलवर सादर करून त्यानंतर कोणत्याही परदेशी मिळकतीसंदर्भातील कामासाठी अधिकृत डिलरकडे त्याची प्रत देतात.

करदात्यांना  http://www.incometax.gov.in  या पोर्टलवरील  15CA/15CB  या आयकर  फॉर्म्सचे इलेक्ट्रॉनिक फायलिंग करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेता करदाते, वरील फॉर्म्स छापील स्वरूपात अधिकृत डिलर्सकडे 30 जून 2021 पर्यंत सादर करु शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशातील मिळकत असणाऱ्यांना सादर करावे लागणारे असे फॉर्म्स  अधिकृत डिलर्सनी 30 जून 2021 पर्यंत स्विकारावेत. यावरील प्रत-ओळख क्रमांक म्हणजे डॉक्युमेंट आयडी मिळवण्यासाठी नव्या ई-फाईलिंग पोर्टलवर हे फॉर्म्स या तारखेनंतर अपलोड करता येतील अशी सुविधा देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!