भारतीय स्टार ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंगची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा

नई दिल्ली,

टोकियो ऑॅलिम्पिक कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघाचा स्टार ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंह याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली.

रूपिंदर पाल सिंह याने या संदर्भात एक टिवट केले आहे. यात तो म्हणतो, मी तुम्हाला भारतीय हॉकी संघातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय सांगू इच्छितो. मागील काही महिने, माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ राहिले. टोकियोमध्ये आपल्या संघासोबत पोडियमवर उभे राहणे हा अनुभव मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही.

युवा आणि प्रतिभावान खेळाडूंसाठी संधी देण्याची वेळ आली आहे. असे मला वाटत. मी मागील 13 वर्षापासून भारतासाठी खेळण्याचा आनंद घेत आहे. ही संधी युवा खेळाडूंना मिळायला हवी, असे देखील रूपिंदर पाल सिंहने म्हटलं आहे.

रूपिंदर पाल सिंहने भारतासाठी 223 सामने खेळली आहेत. तो टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये 41 वर्षानंतर पदक जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य आहे. टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारताने कास्य पदकाच्या सामन्यात जर्मनीचा 5-4 ने पराभव करत पदक जिंकले होते. या सामन्यात रुपिंदर पाल सिंहने एक गोल केला होता. याशिवाय सिमरनजीत सिंहने दोन तर हार्दिक सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!