संयुक्त राष्ट्र महासभेत अनेक नेत्यांनी करोना मदतीसाठी भारताला दिले धन्यवाद

नवी दिल्ली

या महिन्यात 21 ते 27 सप्टेंबर मध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय सत्रात बोलताना अनेक देशांनी कोविड 19 लस आणि करोना नियंत्रण सामग-ीचा पुरवठा केल्याबद्दल भारताचे विशेष आभार मानले आणि धन्यवाद दिले आहेत. महासभेच्या 76 व्या सत्रात बोलताना भारत तसेच अन्य देशांनी कोविड लस पुरविल्याबद्दल तसेच आवश्यक वैद्यकीय सामग-ीचा पुरवठा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली.

सुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी सर्व देशांनी या महासाथीचा मुकाबला करताना एकजूट दाखविली असे सांगून भारत, नेदरलंड, चीन व अमेरिकेने त्यांच्या देशाला केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद दिले. नायजेरियाचे राष्ट्रपती मुहम्मद बुहारी यांनी लस निर्यातीबद्दल भारत, अमेरिका, चीन, तुर्कस्थानला धन्यवाद दिले तर सेंट लुसियाचे पंतप्रधान फिलीप पियेरे, घानाचे राष्ट्रपती नाना आडो दांकावा यांनी भारताने केलेल्या विनाअट मदतीबद्दल आभार मानले.

नेपाळ सरकारने लस आणि वैद्यकीय सामग-ी पुरवठा केल्याबद्दल भारत आणि चीन याना धन्यवाद दिले तर भूतानचे पंतप्रधान लोते शेरिंग यांनी यूनएन व भारताने करोना काळात विना अट मदतीचा हात दिल्याबद्दल खास आभार मानले. भारत ‘वॅक्सीन मैत्री’ कार्यक्रमाअंतर्गत 2021 च्या चौथ्या तिमाही पासून कोविड 19 लस निर्यात पुन्हा सुरु करणार आहे. दुसर्‍या लाटेत देशात लसीची टंचाई जाणवत असल्याने ही निर्यात थांबविली गेली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!