पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता

नवी दिल्ली,

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग-ेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. पंजाब काँग-ेसमध्ये अंतर्गत घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग-ेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला दाखल झाल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अमरिंदर सिंग मंगळवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत आणि ते कालच अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र नवज्योतसिंग सिद्धूंनी पंजाब काँग-ेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खळबळ माजली. त्यानंतर काँग-ेस मंत्रिमंडळातील चार सदस्यांनी राजीनामा देत आपली नाराजी जाहीर केली. या सर्व घडामोडींमुळे शाह आणि सिंग यांची भेट पुढे ढकलण्यात आली. मात्र काल अमरिंदर सिंग यांनी आपण अमित शाह यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करून दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आल्याचे सांगितले होते. मात्र आज कॅप्टन व शाह यांच्या भेटीने ते लवकरच भाजपवासी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केंद्रीय कृषीमंत्री पद मिळण्याची शक्यता –

अमरिंदर सिंग लवकरच काँग-ेसला रामराम करून हाती कमळ घेऊ शकतात. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हरयाणा, पंजाबमध्ये शेतकर्‍यांचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये हजारो शेतकर्‍यांचा सहभाग आहे. त्यामुळे कॅप्टन सिंग यांना कृषिमंत्री पद मिळाल्यास शेतकर्‍यांची नाराजी दूर करण्यात त्यांची कसोटी लागू शकते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!