ऑॅक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील बँकांना ’या’ दिवशी असणार सुट्टी
नवी दिल्ली,
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ऑॅक्टोबरमध्ये बँकांना 21 दिवस सुट्टी आहेत. मात्र, या सुट्टी सलग किंवा एकाच राज्यात बँकांना 21 दिवस सुट्टी नाही. जाणून घ्या, महाराष्टारातील बँकांना ऑॅक्टोबरमध्ये किती दिवस सुट्टी असणार आहेत.
आरबीआयच्या वेळापत्रकानुसार जाहीर होणार्या सुट्?टी विविध राज्यांना वेगवेगळ्या असतात. तर काही सुट्टी देशातील सर्व बँकांना लागू होतात. या वेळापत्रकानुसार ऑॅक्टोरबर 2021 मध्ये बँकांना शनिवारी व रविवारी वगळता केवळ दोन सुट्टी आहेत. तर शनिवार व रविवारीच्या एकूण सहा सुट्टी असणार आहेत.
महाराष्ट्रातील बँकांना या दिवशी सुट्टी
2 ऑॅक्टोबर 2021 – महात्मा गांधी जयंती (संपूर्ण देशभरात)
1. 15 ऑॅक्टोबर 2021- दुर्गा पूजा, दसरा, विजया दशमीनिमित्त संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे. केवळ मणीपूर, हिमाचल प्रदेशमधील बँकांचा अपवाद असणार आहे.
आठवडाखेर या असणार सुट्टी
3 ऑॅक्टोबर 2021 – रविवारी
9 ऑॅक्टोबर 2021 – दुसरा शनिवार
10 ऑॅक्टोबर 2021 -रविवार
17 ऑॅक्टोबर 2021 -रविवार
23 ऑॅक्टोबर 2021 – चौथा शनिवार
24 ऑॅक्टोबर 2021 – रविवार
असे करा बँकांच्या कामांचे नियोजन
बँकांचे तुम्ही पैसे काढणे किंवा जमा करणे असे आर्थिक व्यवहार तुम्ही नेटबँकिंग द्वारे पूर्ण करू शकता.
जर रोकड रकमेची आवश्यकता असले तर पुरेशी रक्कम आधीच काढून घेऊ शकता. जेणेकरून बँकांच्या सुट्टी असताना एटीएममध्ये पर्याप्त पैसे नसताना होणारी धावपळ टळू शकते.
जर तुम्हाला बँकांच्या सुट्टी कालावधीमध्ये रोख पैसे खात्यावर भरायचे असेल, तर काही एटीएमवर तशी सुविधा असते.