सिद्धूंचा राजीनामा फेटाळला, हायकमांड म्हणाले- राज्याच्या नेत्यांनी प्रकरण मिटवावे; कॅबिनेट मंत्री रझिया सुल्ताना सिद्धूंच्या समर्थनासाठी पायउतार

नवी दिल्ली

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग-ेसमध्ये खळबळ उडाली आहे. पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे की काँग-ेस अध्यक्षांनी सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकमांडने राज्यातील नेत्यांना त्यांच्या पातळीवर प्रकरण सोडवण्यास सांगितले आहे.

वज्योत सिंग सिद्धू यांच्या समर्थनार्थ मंत्री रझिया सुल्ताना यांनी चन्नी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मंगळवारी सकाळीच पदभार स्वीकारला होता. रझिया सुल्ताना सिद्धू यांचे सल्लागार आणि माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांची पत्नी आहे. पंजाब काँग-ेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून यापूर्वी पंजाब काँग-ेसचे नवनियुक्त कोषाध्यक्ष गुलजार इंदर सिंह चहल यांनी सिद्धूच्या समर्थनार्थ राजीनामा दिला होता.

दुसरीकडे, पतियाळा येथील नवज्योतसिंग सिद्धू यांच्या घरी काँग-ेसचे आमदार जमू लागले आहेत. पक्षाचे कार्याध्यक्ष कुलजीत नागरा, इंद्रबीर सिंह बुलारिया, मंत्री रझिया सुल्ताना आणि त्यांचे पती मोहम्मद मुस्तफा हे सिद्धूच्या घरी पोहोचले आहेत. मुस्तफा हा सिद्धूचा सल्लागार असून सोमवारीच त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. सिद्धूच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीत विजयाचे आश्वासन दिले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!