ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिली पॅन-इंडिया (बृहद भारत) हेल्पलाइन: एल्डर लाइन (टोल फ्री क्रमांक- 14567)
नवी दिल्ली
भारतात 2050 पर्यंत अंदाजे 20म वृद्ध लोकसंख्या म्हणजेच 300 दशलक्ष ज्येष्ठ नागरिक असतील. हे लक्षणीय आहे; कारण अनेक देशांची लोकसंख्या देखील या संख्येपेक्षा कमी आहे. या वयोगटाला विविध मानसिक, भावनिक, आर्थिक, कायदेशीर आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशात महामारीने त्यात आणखी वाढ झाली आहे. हा वयोगट, देशाच्या एकूण आर्थिक आणि सामाजिक समृद्धतेसाठी ज्ञानाचा पण काहीसा दुर्लक्षित असा महत्वाचा स्त्रोत आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
देशातील ज्येष्ठांच्या पाठिशी ठाम उभे राहण्याच्या वाढत्या गरजेची दखल घेत, भारत सरकारने, त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यासाठी देशातील पहिली पॅन-इंडिया टोल-फ्री हेल्पलाईन-14567- ’एल्डर लाइन’ या नावाने सुरु केली आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन समस्या, कायदेशीर समस्या, मोफत माहिती आणि मार्गदर्शन प्रदान केले जाते, त्यांना भावनिक आधार दिला जातो, त्यांच्याबरोबर गैरवर्तन होत असेल तर कारवाई केली जाते आणि बेघर वृद्धांची सुटका केली जाते.
सर्व ज्येष्ठ नागरिकांना, किंवा त्यांच्या हितचिंतकांना, त्यांच्या उद्देशांना जोडण्यासाठी, त्यांना सामायिक करण्यासाठी, त्यांना दररोज येणार्या समस्यांविषयी माहिती आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी देशभरात एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा ’एल्डर लाइन’चा उद्देश आहे. एल्डर लाईन मध्ये येत, लाखो लोक अशा घटनांची तक्रार करू शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांना पाठिंबा देऊ शकतात – यामुळेच ’एल्डर लाइन: 14567’ वर्तमानात आणि येणार्या काळासाठीही खरोखरच उल्लेखनीय सेवा ठरत आहे.