पंजाबच्या राजकारणात धमाका होणार? कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना
नवी दिल्ली
पंजाबच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं असून कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काँग-ेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.
पंजाब काँग-ेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग-ेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
’आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग-ेसमध्ये राहू शकत नाही’ असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग-ेस हायकमांडला दिला होता. त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपण नाराज असल्याचं सांगत आपल्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचंही सांगितलं होतं.
पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग-ेसचा चेहरा जर नवज्योतसिंह सिद्धू असतील तर त्यांच्या पराभव करण्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या आधीच स्पष्ट केलंय.
पंजाब काँग-ेसच्या अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्लीत येणार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह आता भाजपमध्ये प्रवेश करणार का याची उत्सुकता आहे.
गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ऐनवेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखा मोहरा भाजपच्या हाती लागल्यास सत्तेचा डाव भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आता पंजाबमधील शेतकर्यांचा केंद्र सरकारला असलेला विरोध लक्षात घेता कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची रिक्स घेतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.