पुरवठा साखळीचे स्थितिस्थापकत्व कायम राखतानाच हिंद प्रशांत प्रदेशातील मोठी भागीदारी निभावण्यासाठी भारत आणि ऑॅस्ट्रेलिया यांनी प्रयत्न करावेत : पीयूष गोयल

नवी दिल्ली,

आजादी का अमृत महोत्सव या सोहळ्याच्या माध्यमातून भारत आपल्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असतानाच भारतातील तसेच ऑॅस्ट्रेलियामध्ये धोरणकर्त्यांना मंच मिळवून देण्यात ऑॅस्ट्रेलिया बिझनेस चॅम्पियन्स ग-ुप महत्वाची भूमिका बजावत आहे. कोविड-19 च्या संकटातून दोन्ही देश उभारी घेत असतानाच निर्यातीला वाव देत अर्थव्यवस्थेची उभारी आणि पुनर्बांधणी करण्यासाठी दोन्ही देश एकत्रित प्रयत्न करतील, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग , ग-ाहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. ते ऑॅस्ट्रेलिया व भारत बिजनेस चॅम्पियन्सच्या आज झालेल्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते.

पुरवठा साखळी मध्ये भारताला जागतिक केंद्र बनवताना तसेच अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी आणताना, जागतिक पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग असलेल्या देशांपैकी एक असलेल्या ऑॅस्ट्रेलियाशी भागीदारीला आम्ही पसंती देतो. नव उद्योजकांच्या कौशल्यांचा मोठ्या प्रमाणावर योग्य उपयोग, भरभराटीला आलेल्या खाजगी क्षेत्राबरोबरच अंतर्गत बाजारपेठेचा विकास तसेच कुशल मनुष्यबळ वापर या सर्वांसाठी योग्य मार्ग आखणे हेच आमचे लक्ष्य राहील असे त्यांनी यावेळी नमूद केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!