काश्मीरबाबत वक्तव्य करणार्‍या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताचं सडेतोड उत्तर

नवी दिल्ली,

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काश्मीरबाबत वक्तव्य केलं. इमरान खान यांच्या या वक्तव्याचा भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत चांगलाच समाचार घेतला आहे. भारतानं दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधला आहे आणि दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानचा संपूर्ण इतिहास जगासमोर उघड केला.

भारतानं म्हटलं की, हे लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शहीद म्हणतात.आपल्या परिस्थितीपासून लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान सतत सार्वजनिक मंचावरून भारताविरोधात अपप्रचार करत असल्याचं भारतानं महासभेत सांगितलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना काश्मीरवर वक्तव्य केलं. भारतानं एकतर्फी पावलं उचलून काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप इमरान खान यांनी केला.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे (एहाप्र लंब्) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या काश्मीरबाबतच्या वक्तव्याला तीव- विरोध व्यक्त केला आहे. स्नेहा दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताचे अंतर्गत व्यवहार जागतिक मंचावर आणण्याचा आणि खोट्या गोष्टी पसरवून प्रतिष्ठित फोरमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या प्रयत्नावर यावर उत्तर देण्यासाठी आम्ही आमच्या अधिकाराचा वापर केला आहे. सतत खोटे बोलण्याच्या अशा मानसिकतेची विधाने सामूहिक सहानुभूती आणि तिरस्कारास पात्र आहेत.

दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानचे नेते संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर करून भारताविरोधात खोटा प्रचार करत असल्याची ही पहिली वेळ नाही. दहशतवाद्यांना सहज प्रवेश मिळणार्‍या पाकिस्तानमधील भीषण परिस्थितीपासून लक्ष हटवण्यासाठी ते भारताविरोधात अपप्रचार करत आहेत.

ळर्‍उअ मध्ये भारताने म्हटले की ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय मिळाला होता. आजही लादेनला पाकिस्तानात शहीद म्हटलं जातं आणि त्याचा गौरव केला जातो. पाकिस्तान केवळ आपल्या शेजार्‍यांना हानी पोहचवेल या आशेनं दहशतीला आश्रय देतो. दहशतवादाला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तान जगभरात ओळखला जातो.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!