धावपळीच्या जीवनात मनाला स्पर्शून जाणारा क्षण’; ताज हॉटेलच्या कर्मचार्‍याचं ते काम पाहून भावुक झाले रतन टाटा

नवी दिल्ली

मुसळधार पाऊस हा सामान्य लोकांसाठी मोठी समस्या असतो. याचा सर्वाधिक परिणाम भटक्या प्राण्यांवर होत असतो. अशात आपल्याकडून त्यांच्या बचावासाठी केला गेलेला एक छोटासा प्रयत्नही या प्राण्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. याचंच एक उदाहरण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना ताजमहल पॅलेसच्या एका कर्मचार्‍यानं दिलं.

रतन टाटा यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मुंबईतील ताज हॉटेलमधील एक कर्मचारी भटक्या कुत्र्याला पावासापासून वाचवण्यासाठी छत्री घेऊन उभा असल्याचं पाहायला मिळतं. कर्मचार्‍याच्या या भल्या कामानं टाटा ग-ुपचे चेअरमन रतन टाटा यांचं लक्ष वेधलं आणि आता हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा फोटो आपल्या इन्स्टाग-ाम अकाऊंटवर पोस्ट करत रतन टाटांनी लिहिलं, या मान्सूनमध्ये भटक्या लोकांसोबत आपला आराम वाटा. ताजचा हा कर्मचारी अतिशय दयाळू आहे. त्यानं आपली छत्री भटक्या कुत्र्यासोबत शेअर केली आहे. पाऊस मुसळधार असूनही त्यानं छत्री शेअर केली. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मनाला स्पर्श करून जाणारा एक क्षण.

एक मिलियनहून अधिक लाईक मिळालेल्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. अनेकांनी ताज हॉटेलच्या या कर्मचार्‍याचं मन मोठं असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. तर, अनेकांनी ही गोष्टी नोटीस करण्यासाठी रतन टाटा यांचं कौतुक केलं आहे. एका फॉलोअरनं या पोस्टवर रिप्लाय करत म्हटलं, की सर या कर्मचार्‍याचं मोठं मन आणि दयाळूपणा पाहता त्याचा पगार वाढायला हवा, कारण तो त्यासाठी पात्र आहे. इतरही अनेकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!