शिव्या देणारे जगतात आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य

नवी दिल्ली

बोलताना सतत शिव्या देणारे काही लोक आपण पाहतो. शिव्या देणे हा वाईट संस्कार मानला जातो. मात्र आता नवीन संशोधनात हा समज चुकीचा आहे हे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे त्यामागचे विज्ञान सुद्धा हैराण करणारे आहे. अनेकांना कायम शिव्या देऊन बोलण्याची सवय असते आणि घरी दारी, सार्वजनिक ठिकाणी, समारंभात कुठेही त्यांचे बोलणे शिव्यांशिवाय पूर्ण होत नाही. असे लोक अनेकांना आवडत नाहीत. पण नवीन संशोधनामुळे अश्या लोकांचा तिरस्कार करण्याऐवजी स्वत: सुद्धा शिव्या देण्याची सुरवात काही जण करतील असे म्हटले जात आहे.

न्यूजर्सी येथील कीन विद्यापीठातील संशोधकांनी या संदर्भात केलेल्या अध्ययनात असे दिसून आले की शिव्या देऊन बोलणारे लोक समाधानी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगतात. यामागचे कारण म्हणजे शिव्या दिल्याने त्यांचे वैफल्य कमी होते, परिणामी स्ट्रेस कमी होतो आणि मेंदूवरील ताण कमी झाल्याने त्यांचे आयुष्य वाढते. यासाठी काही विद्यार्थी एका प्रयोगात सामील केले गेले. या विद्यार्थ्यांची बोटे बर्फाच्या पाण्यात काही वेळ बुडवून ठेवली गेली. जे विद्यार्थी शिव्या देणारे होते ते अधिक काळ बोटे बर्फात ठेऊ शकले पण जे शिव्या देणारे नव्हते त्यांना ते शक्य झाले नाही.

यातून असा निष्कर्ष काढला गेला की शिव्या देणारे स्ट्रेसफ्री होतात, परिणामी त्यांचे आयुष्य वाढते उलट ज्यांना स्ट्रेस आहे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि आणीबाणीच्या परिस्थितीत ते लवकर पराभव मान्य करतात.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!