महाराष्ट्र सदनात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी
नवी दिल्ली,
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनात उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.