देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांवर, सलग दुसर्‍या दिवशी 30 हजारांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली

भारतात कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 31,382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 318 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच 24 तासांत 32,542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या आठ दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

16 सप्टेंबर : 34,403 रुग्ण

17 सप्टेंबर : 35,662 रुग्ण

18 सप्टेंबर : 30,773 रुग्ण

19 सप्टेंबर : 30,256 रुग्ण

20 सप्टेंबर : 26,115 रुग्ण

21 सप्टेंबर : 26,964 रुग्ण

22 सप्टेंबर : 31,923 रुग्ण

23 सप्टेंबर : 31,382 रुग्ण

देशातील कोरोनाची स्थिती

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 94 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 28 लाख 48 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. एकूण 3 लाख 162 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशातील सध्याची कोरोना स्थिती :

कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 35 लाख 94 हजार 803

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 28 लाख 48 हजार 273

सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 162

एकूण मृत्यू : चार लाख 46 हजार 368

देशातील एकूण लसीकरण : 84 कोटी 15 लाख 18 हजार डोस

अर्ध्याहून अधिक कोरोना रुग्ण केरळातील

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या सध्या केरळात आहे. केरळमध्ये काल (गुरुवारी) कोरोनाच्या 19,682 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 45 लाख 79 हजार 310 वर पोहोचली आहे. राज्यात 152 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुले मृतांचा आकडा 24,191 वर पोहोचला आहे. राज्यात 1 लाख 60 हजार 46 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!