भारतातील पशूधन क्षेत्रातील सुधारासाठी गेटस फाउंडेशन बरोबरील सामज्यंस करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली

पशूपालन आणि डेअरी विभाग (डीएएचडी) आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन (बीएमजीएफ) ने देशातील खाद्य आणि पोषण सुरक्षेला समर्थन करण्यासाठी भारताच्या पशूधन क्षेत्रात निरंतर सुधारासाठी एक बहुवर्षीय सामज्यंस करार (एमओयू) वर स्वाक्षरी केली आहे.  या कराराचा उद्देश लहान प्रमाणात पशूधन उत्पादकांच्या आर्थिक भलाईचे रक्षण करणे आहे.

डीएएचडीने म्हटले की पशू स्वास्थ्य आणि उत्पादन कार्यक्रमामध्ये सुधार करणे, खाद्य सुरक्षा आणि आर्थिक विकास सुनिश्चित करणे आहे.

मंत्रालयाकडून प्रसिध्द एका निवेदनात म्हटले गेले की हा कार्यक्रम बुधवारी मंत्रालयाच्या मुख्यालयात भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या सुरु असलेल्या सोहळ्या अंतर्गत आयोजीत करण्यात आला होता.

निवेदनात म्हटले की पशूधन क्षेत्राच्या विकासामध्ये पशूपालनाच्या पायभूत सुविधाना मजबूत करणे. उद्यमिता विकास आणि स्वास्थ्य रचनेला लागू करण्याची परिकल्पना करण्यात आली आहे. या सहयोगाच्या माध्यमातून बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन नवीन तंत्रज्ञानाचे डिझाईन आणि वितरण व स्थानिय संदर्भात प्रासंगिक सर्वोत्तम प्रथाच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञान सहाय्यता प्रदान करेल.

भारत सरकारचे प्राधान वैज्ञानिक सल्लागार डॉ.विजय राघवननी सहयोगाच्या महत्वावर प्रकाश टाकत म्हटले की अपेक्षित परिणाम पशूपालन क्षेत्रातील सुधारासाठी स्थिरतेमध्ये एक दिर्घकालीन मार्ग निश्चित करेल जसे की आर्थिक विकास असेल.

पशूपालन व डेअरी विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदीनी म्हटले की पशूधन क्षेत्राला मजबूत करणे वन हेल्थच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी पूर्व आवश्यकतांपैकी एक आहे. हा सहयोग आपल्या डिजिटल पायाभूत, संशोधन आणि विकास क्षमातंना मजबूत करेल आणि सार्वजनिक आणि खाजगी हितधारकांमध्ये पशू मानव संबंधाच्या संबंधात सूचनांच्या अंतराला मार्ग दाखवेल.

सामज्यंस करारावर स्वाक्षरी करणार्‍या पॅनलाला संबोधीत करताना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या इंडिया कंट्रीचे निदेशक एम.हरि मेनन यांनी म्हटले की गेट्स फाउंडेशनला डीएएचडी बरोबर आमच्या भागेदारीला सखोल करण्यासाठी सन्मानीत केले गेले आहे. याचा उद्देश भारत सरकारच्या राष्ट्रीय सतत विकास आणि पशूधन क्षेत्रातील सुधारासाठी लक्ष्य निश्चित करणे आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!