काल दिवसभरात 26,964 कोरोनाबाधितांची नोंद, तर 383 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार अद्याप कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये काल दिवसभरात 26,964 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशात काल दिवसभरात 34,167 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मंगळवारी केरळमध्ये 15,768 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख 61 हजार 195 एवढी आहे.
तर महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,131 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 44 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.02 टक्के आहे. तर राज्यात काल 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
तसेच काल दिवसभरात मुंबईत 352 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,15,757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. कोरोना डबलिंग रेट 1177 दिवसांवर गेला आहे. 24 तासात एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.