रेशन दुकानात सुद्धा भरता येणार वीज,पाणी बिले, पासपोर्ट अर्ज
नवी दिल्ली
देशभरातील रेशन दुकानदारांची कमाई वाढावी आणि ग-ाहकांना आवश्यक अन्य सुविधा घराशेजारी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रीय खाद्य मंत्रालयाने सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड बरोबर नुकताच करार केला आहे. यामुळे जवळच्या रेशन दुकानात ग-ाहक वीज बिले, पाणी पट्टी भरू शकतीलच पण पॅनकार्ड, पासपोर्ट साठी अर्ज सुद्धा करू शकणार आहेत. यामुळे ग-ाहकांना अतिरिक्त सुविधा मिळणार आहेतच पण रेशन दुकानदारांच्या कमाई मध्ये वाढ होणार आहे.
या संदर्भात खाद्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत रेशन दुकानदारांच्या माध्यमातून एक ते तीन रुपये प्रतिकिलो दराने प्रतीव्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जाते. 80 कोटी नागरिक या सुविधेचा फायदा घेतात. पण रेशन दुकानदारांना त्यातून फार पैसा मिळत नाही. त्याचबरोबर सीएससी सेवा केंद्राचा विकास करण्याचे कार्य रेशन दुकानातून ग-ाहकांना अतिरिक्त आवश्यक सेवा दिल्यामुळे होणार आहे. यात वरील सेवांबरोबर निवडणूक आयोग संबंधित सेवा सुद्धा सामील आहेत.