पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांना पदावरून काढावे- राष्ट्रीय महिला आयोगाची सोनिया गांधींना विनंती
नवी दिल्ली,
दलित नेते चरणजित सिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने निशाणा साधला आहे. चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे, अशी सोनिया गांधींना विनंती असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, की चरणजित सिंग हे महिला अध्यक्ष असलेल्या पक्षामुळे पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकले आहे. हा बदला आहे. ते महिलांच्या सुरक्षेला धोका आहे. त्यांच्याविरोधात चौकशी करायला हवी. ते मुख्यमंत्री म्हणून पात्र नाहीत. त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे, अशी सोनिया गांधींना विनंती आहे.
पंजाब महिला आयोगानेही तक्रारीची घेतली होती दखल-
मी टूची 2018 मध्ये मोहीम सुरू असताना चरणजित सिंग यांच्याविरोधातही दावे करण्यात आले होते. राज्य महिला आयोगानेही सू मोटाने प्रकरणाची दखल घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धरणे आंदोलन करत त्यांना काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, तसे घडले नाही, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रीपदाची सोमवारी घेतली शपथ
कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर आमदार चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी लागली आहे. कॅबिनेट मंत्री और तीन वेळा आमदार असलेले चन्नी हे सोमवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. चन्नी हे पंजाबमधील पहिले दलित नेते आहेत, ज्यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली आहे. काँग-ेसचे प्रभारी हरीश रावत यांनी चन्नी यांची काँग-ेसचे गट नेते म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली.
काँग-ेसच्या नेत्याने चरणजित सिंग यांचे केले अभिनंदन
काँग-ेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग, मनीष तिवारी आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी चन्नीचे अभिनंदन केले. अमरिंदर सिंग यांनी आशा व्यक्त केली की, ते सीमावर्ती पंजाब आणि लोकांचे संरक्षण करू शकतील. राहुल गांधी यांनी टिवट केले की, नवीन जबाबदारीसाठी चरणजीत सिंग चन्नी जी यांचे अभिनंदन. आपल्याला पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे सुरू ठेवावे लागेल. विश्वास सर्वात महत्वाचा आहे, असे राहुल यांनी आपल्या टिवटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी पंजाब काँग-ेसचे ज्येष्ठ नेते सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, अशी चर्चा होती, मात्र काँग-ेस हायकमांडने चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.