जावेद अख्तरांची तालिबानच्या नव्या निर्णयावरुन टीका

नवी दिल्ली,

शहरातील अनेक महिला कर्मचार्‍यांना घरीच राहण्याचे आदेश अफगाणिस्तान राजधानी काबूलच्या अंतरिम महापौरांनी दिले आहेत. महापौरांनी जे पुरुषांना शक्य नाही ते महिलांना करण्याची परवानगी देण्याचा आदेश दिल्यामुळे आता सहिष्णू आणि सर्वसमावेशक सरकारचे आश्वासन देणार्‍या तालिबानने सार्वजनिक जीवनातही महिलांवर कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे.

रविवारी पत्रकारांना हमदुल्लाह नमोनी यांनी सांगितले की, पुरुषांऐवजी स्त्रिया जे काम करु शकतात त्यांनाच कामावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये डिझाईन आणि अभियांत्रिकी विभागातील कुशल कामगार तसेच महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

त्यानंतर आता पुन्हा एकदा तालिबानी राजवटीवरुन प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. काबूलमधील महिलांवरील नव्या निर्बंधाबाबत टिवट करत तीन तलाकच्या मुद्द्यावरुनही जावेद अख्तर यांनी जोरदार टीका केली आहे.

अलजजीराच्या माहितीनुसार सर्व काम करणार्‍या महिलांना घरीच राहण्याचे आदेश काबूलच्या महापौरांनी दिले आहेत. मला आशा आहे की सर्व महत्वाच्या मुस्लिम संस्था याचा निषेध करतील, कारण हे सर्व धर्माच्या नावाखाली केले जात आहे. तीन तलाकच्या बचावासाठी कालपर्यंत घोषणा देणारे सगळे कुठे आहेत?, असे जावेद अख्तर यांनी आपल्या टिवटमध्ये म्हटले आहे.

तालिबान्यांनी 1990च्या दशकात मुली आणि महिलांना शाळेत जाण्यावर आणि काम करण्यास बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा तालिबानच्या नवीन सरकारने मुली आणि महिलांच्या हक्कांवर निर्बंध आणणारे अनेक आदेश जारी केले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!