हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवताच हल्ला होणार; या 5 देशांनी न्यूझीलंडला दिला होता इशारा

नवी दिल्ली

न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारा एकदिवसीय सामना ऐनवेळी रद्द केला होता. सामना सुरू होण्याच्या फक्त 5 मिनिटे आधी हा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला. सुरक्षेच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

पाच देशांच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला इशारा

सामना सुरू होण्याआधी 5 देशांच्या सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्याची माहिती दिली होती. यामध्ये न्यूझीलंड, कॅनडा, युसए, युके आणि ऑॅस्ट्रेलिया हे देश होते. छन हशीरश्रव मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यामध्ये दीर्घ चर्चा झाली त्यानंतर ओडिआय आणि टी20 सामने रद्द करण्यात आले. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे म्हणणे होते की, त्यांच्या सर्व सुरक्षा यंत्रणांनी त्यांना सूचना दिल्या होत्या की न्यूझीलंड टीम हॉटेलच्या बाहेर निघाल्यास त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप

इस्लामाबादमध्ये एका संमेलनात रशीद अहमदने म्हटले की, हा कट करणार्‍यांचे नाव घेणार नाही. अफगानिस्तानमध्ये जे काही सुरू आहे.त्यानंतर काही घटक पाकिस्तानला बळीचा बकरा बनवू इच्छिता. जिओ टीव्हीच्या रिपोर्टनुसार किवी टीम द्वारा पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याच्या काही तासानंतर अहमदने म्हटले की, न्यूझीलंडच्या अधिकार्‍यांकडे पाकिस्तानमधील धोक्याचे ठोस पूरावे नाहीत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!