केंद्राने प्रथमच अ श्रेणीचा पोषणयुक्त तांदूळ आणि सर्व साधारण तांदळासाठी समान निर्देश केले जारी

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2021

ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने प्रथमच पोषण युक्त तांदूळ साठ खरेदीमध्ये श्रेणी अ चा पोषणयुक्त तांदूळ आणि सर्व साधारण तांदूळासाठी एकसमान निर्देश जारी केले आहेत, ज्यामध्ये 1% एफआरके (डब्ल्यू/डब्ल्यू)चे सर्व साधारण तांदुळासमवेत मिश्रण करावे लागेल. 

विभागाने खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी केंद्रीय एकत्रित साठ्या करिता खरेदीसाठी  एक समान निर्देश जारी केले.सामान्य प्रक्रिये अंतर्गत धान, तांदूळ आणि ज्वारी, बाजरी, मका, यासारख्या भरड धान्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांमध्ये या समान निर्देशाविषयी व्यापक प्रचार करण्याची विनंती राज्य सरकारांना करण्यात आली आहे. ज्यायोगे त्यांच्या कृषी मालाला योग्य मूल्य मिळेल आणि साठा नाकारणे पूर्णपणे टाळता येईल.

खरीप विपणन हंगाम 2020-21 साठीची खरेदी एकसमान  निर्देशानुसारच झाली पाहिजे असे सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि भारतीय अन्न महामंडळाला कळवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे हित रक्षण आणि प्रोत्साहन करण्यासाठी भारत सरकारने हरियाणा आणि पंजाब संदर्भात 26 सप्टेंबर  2020  पासून आणि देशातल्या इतर भागासाठी 28 सप्टेंबर 2020 पासून खरीप खरेदी काळ  अलीकडे केला आहे. भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य खरेदी एजन्सीना खरेदी सुरळीत आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देणे सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!