राष्ट्रीय महिला आयोगाने महिला विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी क्षमता वृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम केला सुरु

प्रत्येक क्षेत्रात अधिक महिला नेतृत्वाची आवश्यकता असून हा कार्यक्रम महिलांना अधिक उत्तम नेता म्हणून घडवेल : रेखा शर्मा

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2021

महिलांना स्वावलंबी आणि रोजगारासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महिला आयोगाने, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर महिला विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी क्षमता वृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम सुरु केला आहे. रोजगार बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी महिला विद्यार्थिनी सज्ज राहाव्यात या दृष्टीने आयोगाने, व्यक्तिमत्व विकास उभारणी, व्यावसायिक करिअर कौशल्य आणि डिजिटल साक्षरता आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर याविषयी सत्र आयोजित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांशी समन्वय साधला आहे.

हरियाणाच्या केंद्रीय विद्यापीठाशी समन्वय साधत राष्ट्रीय महिला आयोगाने आज आपला पहिला कार्यक्रम जारी केला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले .

प्रत्येक क्षेत्रात अधिक महिला नेतृत्वाची आवश्यकता असून हा कार्यक्रम  महिलांना अधिक उत्तम नेता म्हणून घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा अभ्यासक्रम,तर्कशुद्ध आणि गुणदोष टिपणारा विचार करण्यावर भर देणार असून रोजगाराभिमुखता वाढवण्यासाठी संवाद आणि परस्पर कौशल्याचा उपयोग यावर लक्ष केंद्रित करणार आहे. वैयक्तिक क्षमता वृद्धी,व्यावसायिक कारकीर्द कौशल्य, डिजिटल साक्षरता आणि सोशल मिडीयाचा प्रभावी उपयोग अशा तीन विभागात याची विभागणी करण्यात आली आहे.

ही तिन्ही सत्रे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनी,माय गव्ह द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रश्न मंजुषेत सहभागी होतील. विषयाचे आकलन त्यांना झाले आहे किंवा नाही याची परीक्षा इथे घेतली जाईल.या कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण सत्रे, पुस्तिका यावर ही चाचणी आधारित राहील. प्रश्न मंजुषेनंतर सर्व सहभागी झालेल्यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या, माय गव्ह आणि संस्था प्रमुखांच्या सहीचे,  प्रमाणपत्र प्राप्त होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!