उत्तर प्रदेश : दहशतवादी ओसामाचा काका रहमानचे आत्मसर्मपण
नवी दिल्ली,
आयएसआय प्रशिक्षीत दहशतवादी ओसामा ज्याला 14 सप्टेंबरला दिल्ली पोलिसांनी सणाच्या काळामध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना बनविणार्या एका सक्रिय दहशतवादी मॉडयूलचा भांडाफोड केल्यानंतर अटक करण्यात आली होती तर त्याचा काका हुमैद उर रहमानने प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे. अधिकार्याने याची शनिवारी माहिती दिली.
अधिकार्यानुसार रहमानने शुक्रवारी करेली ठाण्यात आत्मसमर्पण केले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या आधीच रहमानच्या विरोधात लुकआऊट नोटिस प्रसिध्द केली होती. त्याच्यावर आरोप आहे की दिल्लीतील जामिया नगरचा रहिवाशी रहमान भारतामध्ये पूर्ण दहशतवादी नेटवर्कला कोऑर्डिनेट करत होता.
तपासाची माहिती ठेवणार्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले की रहमानने ओसामा आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये राहणार्या जीशान कमरला पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी ओमानची राजधानी मस्कटला पाठविले होते.
हे दोघेही ज्यावेळी मस्कटला पोहचले तर पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस (आयएसआय) ने त्यांना स्फोटक आणि बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी समुद्रा मार्गे ग्वादर बंदरराला आणले. ओसामा आणि जीशान कमरला रोजच्या वापरात असलेल्या वस्तूं पासून बाँब आणि आईईडी बनविणे आणि आगी लावण्याचे प्रशिक्षण दिले होते. याच बरोबर त्यांना लहान फायरआर्मस आणि एके-47 ला संभाळण्याचे आणि उपयोगाचे प्रशिक्षणही दिले गेले होते.
चौकशीतून माहिती पडले की ओसामा एप्रिलमध्ये मस्कटसाठी निघाला होता जेथे त्यांची भेट जीशानशी झाली होती. ते 15-16 बंगाली भाषा बोलणार्या लोकांशी जोडले गेले आणि अनेक गटामध्ये विभाजीत झाले. यात जीशान व ओसामाला एकाच समुहात ठेवले गेले.
पुढील काही दिवसांमध्ये अनेक लहान समुद्री प्रवासानंतर अनेक वेळा नाव बदल्यानंतर त्यांना पाकिस्तानमधील ग्वादर बंदराच्या जवळील जिओनी शहरात आणले गेले. येथे त्यांचे स्वागत एका पाकिस्तानीने केले जो त्यांना थट्टाच्या एका फार्महाऊसमध्ये घेऊन गेला.
फार्महाऊसमध्ये आधी पासूनच तीन पाकिस्तानी नागरीक होते यापैकी दोन जब्बार आणि हमजाने त्यांना प्रशिक्षण दिले. हे दोघेही पाकिस्तानी सैन्यातील होते कारण त्यांनी सैन्य पोषाख घातलेला होता. प्रशिक्षण जवळपास 15 दिवस चालले आणि यानंतर त्यांना समुद्री मार्गाने मस्कटला माघारी नेण्यात आले.