पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
नवी दिल्ली
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती भारतात, गेल्या 24 तासात 64,51,423 लसींच्या मात्रा, पात्र नागरिकांना देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात आतापर्यंत एकूण कोविड-19 लसीकरणाच्या 76.57 कोटीपेक्षा जास्त मात्रा (76,57,17,137) देण्याचा टप्पा ओलांडला आहे. एकूण 77,22,914 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
गेल्या 24 तासात 64.5 लाखांहून अधिक लसींच्या मात्रांचे वितरण. गेल्या 24 तासात 38,303 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,25,60,474 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून बरे होण्याचा दर 97.64म.इतका झाला आहे. सलग 81 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वयित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात देशभरात 30,570 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,42,923 आहे.उपचाराधीन रुग्ण, त्यांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.03म इतके आहे.
देशात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात 15,79,761 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत एकूण 54.77 कोटीहून अधिक (54,77,01,729) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.93म असून गेले 83 दिवस हा दर 3म पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.94म असून गेले 17 दिवस हा दर 3म पेक्षा कमी आणि 100 दिवसांपासून 5म पेक्षा कमी आहे.
इतर अपडेट्स:-
केंद्र सरकारने आतापयर्ंत सर्व स्त्रोताद्वारे 76.11 कोटींपेक्षा जास्त (76,11,49,825) लसींच्या मात्रा राज्येकेंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि 1.65 कोटी पेक्षा जास्त मात्रा (1,65,76,510) पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय लसीच्या 5.33 कोटी पेक्षा जास्त (5,33,75,475) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.