’मोदींना पंतप्रधान म्हणून घोषित करण्याआधी भाजपसुद्धा बैठक घेतं’…! कोहलीच्या कॅप्टन्सीवर भडकले गावस्कर
नवी दिल्ली,
विराट कोहलीने ऊ20 चं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी या निमित्ताने इउउख आणि टीम सिलेक्शन कमिटीच्या कारभारावरच कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
ऑॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ळअए मध्ये होणार्या ऊ20 ेंदीत् ण्ल्ज् स्पर्धेनंतर आपण भारतीय ऊ-20 संघाची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराट कोहलीन ऊैग्ूूी पोस्ट करून जाहीर केलं. कोहली यानंतर ऊ20 क्रिकेट टीममध्ये फलंदाज म्हणून खेळत राहणार आणि वनडे तसंच टेस्ट क्रिकेट संघाचं नेतृत्वही करत राहणार, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावरूनच सुनील गावस्कर यांचा पारा चढला आहे. ँण्ण्घ् च्या कार्यपद्धतीवरच त्यांनी आगपाखड केली.
भारतीय संघात कोण खेळणार, कोण नेतृत्व करणार हे ठरवायला निवड समिती असते. विराट कोहलीच्या कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयानंतर एका खासगी वृत्तवाहिनीवर चर्चा करताना सुनील गावस्कर यांनी तीव- शब्दांत नाराजी व्यक्त केली. इउउख आणि सिलेक्शन कमिटीने कित्येक वर्षांत कॅप्टन कोण हे ठरवण्यासाठी बैठकच घेतलेली नाही. किमान फॉरमॅलिटी म्हणून तरी एक बैठक बोलवून कर्णधाराचं नाव सुचवून ते निश्चित करण्यात यायला हवं होतं. काही सेकंदांची ही प्रक्रिया झाली असती तरी चाललं असतं, पण ँण्ण्घ् ने प्रक्रियेचा भाग म्हणून तरी किमान कर्णधार निवडीची मीटिंग करायला हवी होती. गेल्या 4 वर्षांत एकदाही ँण्ण्घ् ने ही प्रक्रिया पार पाडलेली नाही, असं गावस्कर यांचं म्हणणं आहे.
गावस्कर यांनी उदाहरण देताना देशाच्या सर्वोच्च महत्त्वाच्या पदी असणार्या पंतप्रधान मोदींचंच नाव घेतलं. ‘भाजपनेही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्याची फॉरमॅलिटी पूर्ण केली होती. त्यांनीही पंतप्रधान निवडीची बैठक घेऊन प्रक्रियेप्रमाणे मोदींचं नाव सुचवलं होतं. पण इउउख अशा प्रक्रिया जुमानतच नाही का?‘ असा सवाल गावस्कर यांनी उठवला.
भारतीय टीमचा कर्णधार निवडण्यासाठी वेगळी बैठक घ्यायची पद्धत आहे. कर्णधाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याला सिलेक्शन कमिटीच्या बैठकीला आमंत्रित करण्यात येत असे. आधी तर कर्णधाराला सिलेक्शन कमिटीमध्ये मताचा अधिकारही नव्हता. फक्त त्यांचा विचार ऐकून घेतला जायचा. आता कर्णधाराला निवड प्रक्रियेत मोठं स्थान असतं.