नौदलातील निवृत्त सैनिकांसाठी पुनर्रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सी आणि फ्लिपकार्ट यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली,

इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्स्सी (आयएनपीए) आणि फ्लिपकार्ट ने आज एक सामंजस्य करार केला, या कराराअंतर्गत फ्लिपकार्ट समूहात नौदलातील निवृत्त नौसैनिकांच्या भर्तीसाठी दोन्ही संस्थांना मदत होणार आहे. भारतीय नौदलाचे कार्मिक सेवा नियंत्रक व्हाइस एडमिरल सूरज बेरी आणि फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रजनीश कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी भारतीय नौदल आणि फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

या सामंजस्य कराराद्वारे, आयएनपीए फ्लिपकार्टच्या भरती मानकांनुसार संबंधित पदासाठी माजी नौसैनिक उमेदवार ओळखून निश्चित करेल, या बदल्यात, कंपनी, या व्यक्तींना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कंपनीअंतर्गत समावेशन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सक्षम करेल.

फ्लिपकार्टने त्यांच्या ’फ्लिपमार्च’ योजनेनुसार हा कार्यक्रम हाती घेतला आहे, माजी सैनिकांनी त्यांच्या सेवा कालावधी दरम्यान मिळवलेली पात्रता, अनुभव आणि गुणविशेषानुसार त्यांना संधी प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री रजनीश कुमार म्हणाले की, ”एक देश म्हणून आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि योगदानाचे ॠणी आहोत.आमच्या फ्लिपमार्च कार्यक्रमाद्वारे, कॉर्पोरेट जगात संधी शोधण्यासाठी, आमच्या प्रतिभेला समृद्ध करण्यासाठी, तसेच त्यांच्या कौशल्य संचाचा लाभ घेत सतत रोजगारसंधी शोधण्याच्या सोयीच्या दृष्टीने माजी सैनिकांसाठी एक पूल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.आम्हाला इंडियन नेव्हल प्लेसमेंट एजन्सीच्या (आयएनपीए) प्रयत्नांशी संबंधित असल्याचा आणि परस्पर हिताच्या दृष्टीकोनातून आमच्या कार्यक्रमांमध्ये वाढ होत असल्याचा अभिमान आहे.”

भारतीय नौदलाचे कार्मिक सेवा नियंत्रक व्हाइस एडमिरल सूरज बेरी यांनी सांगितले की, ‘माजी कर्मचार्‍यांना , आमच्या निवृत्त सैनिकांना ,आपल्या राष्ट्राच्या सेवेनंतर रोजगाराच्या संधी शोधण्यासाठीच्या सुविधा प्रदान करण्यासाठी आयएनपीए वचनबद्ध आहे.आणि कॉर्पोरेट क्षेत्रासह हे कार्य सक्षमपणे करणारे कार्यक्रम विकसित करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.आम्ही या उपक्रमाअंतर्गत फ्लिपकार्ट सोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!