डीसीजीआयकडून स्पुटनिक लाइटच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी
नवी दिल्ली
डीसीजीआयकडून स्पुटनिकच्या सिंगल डोस लसीच्या भारतीयांवरील तिसर्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी मिळाली असून या लसीचे स्पुटनिक लाइट असे नाव असून या चाचण्या लवकरच सुरू केल्या जातील. रशियाहून भारतात गुणवत्ता आणि सुरक्षा प्रमाणीकरणासाठी लसीची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. पॅनेशिया बायोटेकने पाठवण्यात आलेली खेप तयार केलेली आहे.
स्पुटनिक लाइटच्या तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची गरज 30 जून रोजी नाकारण्यात आली होती. त्यानंतर, विषय तज्ज्ञ समिती म्हणून ओळखल्या जाणार्या तज्ज्ञांच्या पॅनेलने हैदराबादस्थित डॉ. रेड्डी यांना 5 ऑगस्ट रोजी चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. फार्मा कंपनी पॅनेशिया बायोटेकने तयार केलेल्या स्पुटनिक लाइटचे नमुने आधीच गुणवत्ता, सुरक्षा तपासणीसाठी कसौली येथील सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले गेले आहेत, तर हॉस्पिटलमध्ये ट्रायल साइटस सेट करण्यासाठीही पोहोचले आहेत. या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.