तालिबानच्या धमक्यांतून वाचत अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघ पाकिस्तानमध्ये दाखल

नवी दिल्ली,

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून देशातून बाहेर जाण्यासाठी आपतकालीन मानवीय व्हिजा दिल्या गेल्यानंतर अफगाणिस्तानच्या महिला फुटबॉल संघातील खेळाडू आपल्या कुटुंबा बरोबर तोरखम सीमेला ओलांडून मंगळवारी रात्रीला पाकिस्तानला पोहचला.

डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार राष्ट्रीय ज्युनिअर मुलींच्या संघाशी संबंधीत फुटबॉल खेळाडूना खेळात सामिल असल्याच्या कारण तालिबानकडून धमक्यांचा सामना करावा लागत होता. त्यांना कतरचा प्रवास करायचा होता जेथे अफगाण शरणार्थीना 2022 फिफा विश्व कपसाठी एक जागी ठेवले गेले होते. परंतु 26 ऑगस्टला काबुल विमानतळावर झालेल्या एका बॉबस्टोफानंतर त्या अडकून राहिल्या होत्या

अफगाणिस्तानचा राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ ऑगस्टच्या शेवटच्या आठवडण्यात ऑस्ट्रेलियाई सरकारच्या एका व्यवस्थेनंतर देशा बाहेर पडला होता तर युवा संघाला विमान मात्र मिळू शकले नाही कारण त्यांच्याकडे पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे नव्हते. त्यावेळे पासून त्या तालिबान पासून वाचण्यासठी लपत राहिल्या होत्या.

32 फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबासह एकूण 115 लोकांना पाकिस्तानला आणण्यासाठीचे पाऊल हे बिटिश आधारीत एनजीओ फुटबॉल फॉर पीसद्वारा सरकार आणि पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन ऑफ अशफाक हुसैन शाहच्या सहयोगाने केले गेले.

फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनोनी मागील आठवडयात दोहामधील आपल्या दौर्‍या दरम्यान अफगाण शरणार्थाींचा दौरा केला होता परंतु फिफा मात्र अफगाणमध्ये अडकलेल्या अफगाणि महिला खेळाडूना कोणतीही मदत करण्यात निष्क्रीय राहिल्याने संस्थेवर टिका होऊ लागली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!