नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना ‘अब्बा जान’ वक्तव्यावरुन फटकारले

नवी दिल्ली,

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात असे. पण आता सर्वांना समान न्याय मिळतो. 2017 पूर्वी फक्त जे ‘अब्बा जान’ म्हणत होते, तेच राशन संपवत असल्याचे वक्तव्य केले होते. योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नेहमी परखडपणे आले मत मांडणारे बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं ‘अब्बा जान’चं वक्तव्य अपमानास्पद असून त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे देखील नसल्याचे नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत. ही व्यक्ती जी आहे ती आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांचे हे ‘अब्बा जान’ वक्तव्य द्वेषयुक्त वक्तव्यांचा भाग आहे, ते आधीपासून जे बोलत असल्याची टीका नसीरुद्दीन शाह यांनी केली आहे.

रविवारी कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टीवर निशाणा साधत आणि आरोप केला की, गरिबांचे राशन समाजवादी पार्टीचे सरकार खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणार्‍या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. गरिबांना 2017 च्या अगोदर राशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे राशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे राशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होते. आज गरिबाचे राशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतले तर नक्कीच तुरूंगात जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!