योगी सरकारच्या जाहिरातीसह धार्मिक टिप्पणीवर काँग-ेसने साधला निशाणा
नवी दिल्ली,
उत्तर प्रदेशमधील काही वर्तमानपत्रातील योगी सरकारच्या जाहिरातीमध्ये थेट पश्चिम बंगालचे उड्डाणपूल छापले. त्यावरून काँग-ेसचे वरिष्ठ नेता अभिषेक मनु सिंघवी यांनी योगी सरकारची खिल्ली उडविली आहे.
काँग-ेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. त्यांनी टिवटमध्ये म्हटले, की उत्तर प्रदेशमधील विकास दाखविण्यासाठी बिश्त सरकारने (योगी सरकार) कोलकात्यामधील उड्डाणपूल दाखविले. जर विकास दाखवायचा होता, तर मायावती यांनी तयार केलेले एफ 1 ट्रॅक दाखवायचा होता. अन्यथा अखिलेश यांनी तयार केलेला आग-ा महामार्ग दाखवायचा होता. त्यामध्ये किमान उत्तर प्रदेशचे फोटो तरी आले असते.
वर्तमानपत्राने मागितली माफी-
रविवारी काही वर्तमानपत्रांमध्ये मुख्य पानावर योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीचे फोटो म्हणून विकासाचे फोटो दाखविले होते. त्यामधील एक फोटो कोलकातामधील उड्डाणपुलाचा होता. तर दुसरा फोटो हा एचएसई व्हिजन या कंपनीचा होता. योगी सरकारच्या विकासाचा दावा केलेले दोन्ही फोटो उत्तर प्रदेशचे नव्हते. या जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर वर्तमानपत्राने माफी मागत मार्केटिंग विभागाच्या चुकीने फोटो छापल्याचे स्पष्टीकरण दिले.
विशिष्ट धर्माला लक्ष्य करून योगी सरकारची टीका
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एका सभेत बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. 2017 पूर्वी अब्बा जान म्हणणारे रेशन संपवित होते. एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून विधान केल्याने योगी आदित्यनाथ यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. कुशीनगरचे रेशन नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये जात होते. आज कोणी गरिबांचे रेशन घेतले तर त्याला तुरुंगात पाठविले जाईल.
सिब्बल यांची योगी सरकावर टीका
काँग-ेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी टिवट करत योगी सरकारवर टीका केली आहे. आमच्या सरकारला समावेशी अफगाणिस्तान हवा आहे. मात्र, योगी हे अब्बा जान असे विधान करून काय करू इच्छित आहेत, एक समावेश यूपी की विभागणी करून राज्य करणे?