काल दिवसभरात 27 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 219 रुग्णांचा मृत्यु

नवी दिल्ली

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल दिवसभरात काहीशी घट पाहायला मिळाली. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 27,254 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 219 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 37,687 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दुसरीकडे काल दिवसभरात केरळमध्ये 20,240 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 43 लाख 75 हजार 431 वर पोहोचला आहे. तसेच 67 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या वाढून 22,551 झाली आहे. काल दिवसभरात 1 लाख 15 हजार 575 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. तर संसर्गाचा दर 17.51 टक्के एवढा आहे.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 3 हजार 623 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 2 हजार 972 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचबरोबर 46 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अद्याप राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसर्‍या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अद्यापही नवीन कोरोनाबाधित दररोज आढळून येत असून, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!