धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी रेल्वेचं 11 दिवसांचं स्पेशल टूर पॅकेज

नवी दिल्ली,

ज्यांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेने एक सुवर्णसंधी आणली आहे. घ्ींण्ऊण् च्या वेबसाइटनुसार, अत्यंत कमी पैशात वैष्णो देवी ते अयोध्या आणि हरिद्वार इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. हा संपूर्ण प्रवास 10 रात्री आणि 11 दिवसांचा असणार आहे. रेल्वेने सुरु केलेले हे विशेष टूर पॅकेज परवणारं आहे. याशिवाय यात मिळणार्‍या सुविधा देखील खूप चांगल्या आहेत. या दौर्‍यावर तुम्ही एकटे किंवा संपूर्ण कुटुंबासह जाऊ शकता.

घ्ींण्ऊण् ने या विशेष दौर्‍याला उत्तर भारत यात्रा वैष्णो देवी असे नाव दिले आहे. या संपूर्ण दौर्‍यात मथुरा, वैष्णो देवी, अमृतसर, हरिद्वार आणि दिल्लीसारख्या शहरांना भेट देता येणार आहे. या यात्रेचं बुकिंग घ्ींण्ऊण् च्या अधिकृत वेबसाईटवर ऑॅनलाईन करता येणार आहे. तसेच पर्यटक सुविधा केंद्र किंवा रेल्वेच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील बुकींग करता येणार आहे. या संपूर्ण प्रवासात एका व्यक्तीचे भाडे 10,400 रुपये असेल. यासह, कम्फर्ट पॅकेजमधील किंमत प्रति व्यक्ती सुमारे 17,330 रुपये आहे.

ट्रेन कुठे-कुठे जाणार?

ट्रेनचे बोर्डिंग पॉईंटस- रेनिगुंटा, वेल्लोर, अंगुल, विजयवाडा, गुंटूर, नालगोंडा, सिकंदराबाद, काजीपेट, पेड्डापल्ली, रामागुंडम आणि नागपूर. ट्रेनचे डी बोर्डिंग पॉईंटस – नागपूर, रामागुंडम, पेड्डापल्ली, काजीपेट, सिकंदराबाद, नलगोंडा, गुंटूर, विजयवाडा, अंगुल, वेल्लोर आणि रेनिगुंटा. डेस्टिनेशन – आग-ा, मथुरा, वैष्णो देवी, अमृतसर, हरिद्वार आणि दिल्ली.

टूर पॅकेजमध्ये असलेल्या सुविधा

ट्रेनच्या स्लीपर कोचने प्रवास करत असाल तर तुम्हाला रात्रभर मुक्काम आणि सकाळचे हॉलडॉरमेट्री निवास उपलब्ध करून दिले जाईल जेणेकरून तुम्ही इथे राहू शकाल. रात्रभर मुक्कामासाठी हॉटेलची सोयही केली जात आहे. अशा डब्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांना सकाळी फ्रेश होण्यासाठी रुम दिली जाईल. सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!