तेल वितरण कंपन्यांकडून इंधन किंमतींमध्ये परिवर्तन नाही

नवी दिल्ली,

देशातील तेल वितरण कंपन्या (ओएमसी्) नी शुक्रवारी सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नाही तर इंटरकॉटिनेंटल एकाचेंजवर ब-ेंट क्रूडचा भाव 72 डॉलर प्रति बॅरलच्या वर व्यवसाय करत होता.

दिल्लीमध्ये पेट्रोल 101.19 रुपये प्रति लिटर राहिले तर मुंबईमध्ये 107.26 रुपये, चेन्नईमध्ये 98.96 रुपये आणि कोलकातामध्ये 101.62 रुपये प्रति लिटरवर अपरिवर्तीत राहिले. याच बरोबर डिझेलच्या किंमतीही शुक्रवारी अपरिवर्तीत राहिल्या असून डिझेलची किंमत दिल्लीमध्ये 88.62 रुपये, मुंबईमध्ये 96.19 रुपये, चेन्नईमध्ये 93.26 रुपये आणि कोलकातामध्ये 91.71 रुपये प्रति लिटर राहिल्या.

शुक्रवारी जागतीकस्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये तेजी आली. इंटरकॉटिनेंटल एक्सचेंजवर ब-ेंट क्रूडचा नोव्हेंबरचा अनुबंध सध्यातरी 72 डॉलर प्रति बॅरलच्या वर व्यवसाय करत आहे.  देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती शुक्रवारी स्थिर राहिल्या परंतु त्यांची किरकोळ किंमत काही विशेष राज्यात स्थानिय कराच्या आधारावर विविध होत्या.

तेल कंपन्याद्वारा स्विकारण्यात आलेल्या किंमती निश्चितीकरण फॉर्मूल्या अंतर्गत त्यांच्याद्वारा दैनिक आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची समीक्षा आणि संशोधन केले जाते आहे. नवीन किंमती दररोज सकाळी 6 वाजता लागू होत असतात.

किंमतींची दैनिक समीक्षा आणि संशोधन मागील 15 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि विदेशी विनिमय दरांवर आधारीत आहेत. मात्र जागतीक तेल किमतीमधील चढ उताराने ओएमसीला या फॉर्मूल्याला समग-पणे पालन करण्या पासून रोखले आहे आणि आता दिर्घकाळानंतर संशोधन केले जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!