लस घेतलेल्या भारतीयांसह घोषीत देशातील नागरीकांसाठी यूएई 12 सप्टेंबर पासून प्रवास प्रतिबंधाना हटविणार

नवी दिल्ली,

संयुक्त अरब अमिरात (यूएई) भारता सारख्या देशातून वैध व्हिजासह कोरोना प्रतिबंधीत  लस घेतलेल्या रहिवाश्यांना 12 सप्टेंबर पासून आपल्या देशात येण्याची परवानगी देणार आहे अशी घोषणा राष्ट्रीय आपतकालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनसीईएमए) ने शुक्रवारी केली.

अल अरबियाने सांगितले की निर्णयामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, व्हियतनाम, नामीबिया, झांबिया, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, सिएरा लियोन, लाइबेरिया, दक्षिण अफ्रिका, नाइजीरिया आणि अफगाणिस्तानमधून येणारे प्रवासी यात समिल असतील. यामध्ये निवासही सामिल आहेत जे एनसीईएमएच्या नुसार सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून विदेशात राहत आहेत.

निवेदनानुसार जे लोेक कोणत्याही डब्ल्यूएचओ अनुमोदीत लशीसह पूर्णपणे लस घेतलेले आहेत आणि जे प्रत्येक देशासाठी निलंबन निर्णय प्रसिध्द केल्या गेल्यानंतर सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून निलंबीत यादीपैकी कोणत्याही एका देशात राहत आहेत ते एका नवीन प्रविष्टीअंतर्गत देशात येऊ शकतात. प्रवासीना परत एकदा यूएईमध्ये प्रवेश करण्यासाठी काही प्रक्रियांचे पालन करावे लागेल.

ओळख आणि नागरीकतासाठी केंद्रिय प्राधिकरण (आयसीए) च्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करणे आणि आवश्यक अनुमोदन प्राप्त करण्यासाठी लशीाकरण अर्जाला पूर्ण करावे. त्यांना यूएईला जाण्याच्या आधी अनुमोदीत लशीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

प्रवाश्यांना एका क्यूआर कोड असलेल्या अनुमोदीत प्रयोगशाळामधील त्यांच्या प्रस्थानाच्या 48 तास आधी केलेल्या नकारात्मक पीसीआर चाचणी परिणाम (कोरोनाचे नेगेटिव्ह प्रमाणपत्र) सादर करावे लागेल.

सर्व खबरदारीच्या उपायांचे पालन करत बोर्डिंगच्या आधी रॅपिड पीसीआर टेस्ट आणि आगमनाच्या चौथ्या आणि आठव्या दिवशी दुसर्‍यांदा पीसीआर टेस्ट करावी लागेल.

एनसीईएमएने म्हटले की 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी या प्रक्रियांमधून सुट्ट देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले गेले की उपर्युक्त देशातून येणार्‍या गैर लशीकरण असलेल्या लोकांसाठी या आधी घोषीत केलेल्या अन्य सर्व खबरदारीचे उपाय लागू असतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!