दिग्विजय सिंहकडून आरएसएसची तुलना तालिबानशी
नवी दिल्ली,
कामकाजी महिलांच्या बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवतांंच्या वक्ताव्यानंतर काँग-ेसचे नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहनी शुक्रवारी आरएसएसची तुलना तालिबानशी केली.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले होते की पुरुष कमविणारे आहेत आणि महिला गृहणी आहेत. यावर दिग्विजय सिंहनी आपली प्रतिक्रिया दिली.
दिग्विजय सिंहनी एका टिवीटमध्ये म्हटले होते की कामकाजी महिलांवरील तालिबान आणि आरएसएसचे विचार समान नाहीत का ?
याच आठवडयात दुसर्यांदा आरएसएसची तुलना तालिबानशी केली गेली आहे. दिग्विज सिंहनी गीतकार जावेद अख्तरच्े समर्थन केले आणि बचाव केला आणि मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले की सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मला माहिती नाही की त्यांनी कोणत्या संदर्भात असे म्हटले होते. परंतु आपल्या राज्यघटनेत आम्ही स्वत:ला व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे.
दिग्विजय सिंह आरएसएसचे कट्टर टिकाकार आहेत आणि ते अधिकत्तर आरएसएसवर टिका करत असतात. ते आरोप करतात की संघटन खोटे आणि नक्षली आख्यान पसरुन हिंदू आणि मुस्लिम समुदायाला विभाजीत करत आहेत.
त्यांनी म्हटले की ज्यावेळी हिंदू आणि मुसलमांनाचे डीएनए एक आहे तर लव जिहाद सारखे मुद्दे कशामुळे उपस्थित केले गेले ? डीएनएचे वक्ताव्य मोहन भागवत यांनी दिले होते.
बातमीनुसार हिंदी चित्रपट गीतकार अख्तर यानी म्हटले होते की त्यांनी तालिबान आणि आरएसएस दरम्यान एक असाधारण समानाता पाहिली. जसे की तालिबानला एक इस्लामिक राज्य हवे आहे तसेच भारतामध्ये आरएसएसला हिंदू राष्ट्र हवे आहे. जगभरामध्ये दक्षिणपंथीना एकच गोष्ट हवी असते. या सर्वांची एकच मानसिकता आहे.