परमबीर सिंग प्रकरण : दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस; 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

नवी दिल्ली,

सीबीआयची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी लाच दिल्याचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती योगेश खन्ना यांच्या खंडपीठाने 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने आनंद डागा आणि सीबीआयचे एएसआय अभिषेक तिवारी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अभिषेक तिवारीने तपासाची माहिती देण्यासाठी आनंद डागाकडून आयफोन 12 प्रो आणि इतर महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली होती. अभिषेक तिवारी तपासासंदर्भात पुण्यात गेले होते, जिथे त्यांना लाच म्हणून महागड्या भेटवस्तू दिल्या गेल्या. कागदपत्रे लीक करण्याच्या बदल्यात तिवारी यांनी अनेक वेळा डागाकडून भेटवस्तू घेतल्या. अभिषेक तिवारीकडे संवेदनशील कागदपत्रे होती. तिवारी यांनी व्हॉटसअ‍ॅपद्वारे डागासोबत अनेक संवेदनशील कागदपत्रे शेअर केली होती. त्यानंतर वरिष्ठ सीबीआय अधिकार्‍यांच्या सूचनेवरून अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला, असेही सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!