पंतप्रधान मोदी म्हणाले, गणपती बाप्पा मोरया, मराठीतून दिल्या खास शुभेच्छा
नवी दिल्ली
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावर असेल. या पावन पर्वाच्या मुहुर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत टिवट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी केलेल्या टवीटमध्ये म्हटलं आहे की, आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!ङ्ग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या काळात कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.