राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडील कोविड – 19 लसीच्या मात्रांच्या उपलब्धतेविषयी अद्ययावत माहिती

नवी दिल्ली

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी आणि मोहिमेची व्याप्ती विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसीच्या अधिक मात्रा उपलब्ध करून देणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे यासाठी त्यांच्याकरिता उपलब्ध असलेल्या लसीच्या मात्रांची आगाऊ स्वरुपात माहिती पुरविणे आणि लस पुरवठा साखळी सुरळीत ठेवून लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात येत आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्र सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून त्यांना मदत करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75म साठ्याची खरेदी करून त्याचा मोफत पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करत आहे.

केंद्र सरकारकडून (मोफत पुरवठा मार्गाने) आणि राज्यांकडून थेट खरेदीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 70 कोटी 63 लाखांहून अधिक (70,63,47,565) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे आणि आणखी जवळपास 96 लाख (96,25,760) मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 5 कोटी 58 लाखांहून अधिक (5,58,07,125) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!