पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षस्थानी; अफगाण संकटावर चर्चा होण्याची शक्यता

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बि-क्स परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. बि-क्स ही ब-ाझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या समुहाची वार्षिक शिखर परिषद आहे. या बैठकीला ब-ाझिलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा उपस्थित राहतील. या बैठकीत अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवर चर्चा होणे अपेक्षित आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नवीन विकास बँकेचे अध्यक्ष मार्कोस ट्रॉयजो, बि-क्स बिझनेस कौन्सिलचे हंगामी अध्यक्ष ओंकार कंवर आणि बि-क्स महिला व्यवसाय आघाडीच्या हंगामी अध्यक्षा डॉ.संगीता रेड्डी यावेळी उपस्थित असतील. यावेळी शिखर परिषदेची थीम ’बि-क्सॅ15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-बि-क्स सहकार्य” आहे.

भारताने चार प्राधान्य क्षेत्रांची ब्लूप्रिंट तयार केली आहे. यामध्ये बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा, दहशतवादविरोधी, एउे साध्य करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा वापर आणि लोकांमध्ये संपर्क वाढवणे यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी दुसर्‍यांदा बि-क्स परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी गोवा शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. बि-क्सचे 15 वे स्थापना वर्ष आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!