प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांना लवकरच मिळू शकते घसघशीत पगारवाढ

नवी दिल्ली

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आर्थिक संकटांचा सामना करणार्‍या खासगी क्षेत्रातील कंपन्या 2022 सालामध्ये आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी 9.4 टक्के पगारवाढ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे खरोखर झाल्यास मागील चार वर्षांमधील ही सर्वात मोठी सरासरी वेतनवाढ ठरणार आहे. कोरोनानंतर पूर्वपदावर येत असणारे अर्थचक्र आणि कौशल्य असणार्‍या कामगारांना आपल्या कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी कंपन्यांमधील स्पर्धा पाहता एट्रिशन रेट हा 20 टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज व्यक्त केला जात असल्यामुळेच सरासरी वेतनामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

वार्षिक वेतनासंदर्भात एऑॅनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पुढील वर्षात सरासरी वेतनवाढ ही 9.4 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना यापूर्वी 2018 मध्ये सरासरी 9.5 टक्के पगारवाढ मिळाली होती. यंदाही सरासरी पगारवाढ ही 8.8 टक्के राहीली आहे. ही पगारवाढ 7,7 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यात आल्यानंतर आर्थिक गाडा पुन्हा सुरु झाला असून अनेक कंपन्यांनी पुन्हा आपले दैनंदिन काम सुरु केल्यामुळेच कामगारांची मागणी आणि पगारवाढीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ही पगारवाढ 2022 म्हणजेच पुढील सहा महिन्यांमध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नवीन वर्षात अनेक कंपन्या आपआपल्या धोरणांप्रमाणे निश्चित करत असल्यामुळे जानेवारीपासून साधारणपणे वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या कर्मचार्‍यांनी मागील वर्षी केलेल्या कामाच्या आधारे पगारवाढीचा निर्णय घेताना दिसतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्यांसंदर्भात सर्वेक्षण करणारी एऑॅन ही फर्म आहे. त्यांनी केलेल्या या सर्वोक्षणामध्ये 39 वेगवेगळ्या क्षेत्रांमधील 1300 हून अधिक कंपन्यांची माहिती गोळा करण्यात आल्यानंतर अहवाल सादर करण्यात आला आहे. सर्व माहिती गोळा करुन त्याचे सखोल विेषण केल्यानंतरच पगारवाढीसंदर्भातील अंदाज बांधण्यात आला आहे.

सर्वेक्षणामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुढील वर्षी 11.2 टक्के सरासरी पगारवाढ होण्याची शक्यता असून हे सर्वाधिक पगारवाढ होणारे क्षेत्र ठरणार आहे. त्यानंतर प्रोफेश्नल सर्व्हिसेस देणार्‍या आणि ई-कॉमर्स सेक्टरमधील कंपन्यांमधील कर्मचार्‍यांनाही मोठा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

10.6 टक्के या दोन्ही क्षेत्रामध्ये सरासरी पगारवाढ ही राहील असा अंदाज आहे. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करणार्‍यांना 8.8 टक्के सरासरी पगारवाढ मिळणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. रिअल इस्टेटसंदर्भातील आकडेवारी तुलनेने कमी वाटत असली, तरी मागील काही वर्षांमध्ये या क्षेत्रातील सरासरी पगारवाढ ही 6.2 टक्के राहिली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील पगार हे 2022 मध्ये सामान्य सरासरीपेक्षा 2.6 टक्के अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!