राज्य विधानसभा निवडणुकींसाठी भाजपकडून निवडणुक प्रभारींची नियुक्ती

नवी दिल्ली

विविध पाच राज्यात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारी अंतर्गत भारतीय जनता पक्ष (भाजप) ने चार राज्यातील निवडणुक प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्तींची घोषणा केली आहे.

ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निडणुका होणार आहेत या राज्यांसाठी भाजपने बुधवारी प्रभारी आणि सह प्रभारींची नियुक्ती केली आहे. यामध्ये केंद्रिय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. याच बरोबर उत्तर प्रदेशातील सहा क्षेत्रीय प्रभारीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच केंद्रिय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पंजाब, प्रल्हाद जोशींना उत्तराखंड आणि भूपेंद्र यादव यांना मणिपूरचे निवडणुक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.

केंद्रिय मंत्री धर्मेद्र प्रधान यांना उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केले असून याच बरोबर त्यांना मदत करण्यासाठी भाजपने सात सहप्रभारीचीही नियुक्ती केली आहे. यामध्ये केंद्रियमंत्री अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, अन्नपूर्णा देवी, शोभा करंदलाजे, खासदार सरोज पांडे आणि विवेक ठाकूर व हरियाणाचे माजी मंत्री कॅप्टन अभिमन्यू सामिल आहेत.

भाजपने उत्तर प्रदेशातील सहा क्षेत्रांसाठी प्रभारी नियुक्त केले आहेत यामध्ये खासदार संजय भाटिया (पश्चिमी प्रदेश), बिहारमधील आमदार संजीव चौरसिया (ब-ज), राष्ट्रीय सचिव वाय.सत्य कुमार (अवध),राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष सुधीर गुप्ता (कानपूर), राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन (गोरखपूर) आणि सुनील ओझा (काशी) यांचा समोवश आहे.

केंद्रिय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि मीनाक्षी लेखीना लोकसभेतील खासदार विनोद चावडासह पंजाबसाठी निवडणुक सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. लोकसभेतील खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय प्रवक्ते सरदार आर.पी.सिंहना उत्तराखंडचे निवडणुक सहप्रभारी बनविले गेले आहे. तर केंद्रिय मंत्री प्रतिमा भौमिक आणि आसामचे मंत्री अशोक सिंघल यांना मणिपूरचे निवडणुक सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.

उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये पुढील वर्षी फेब-ुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने चार राज्यांसाठी निवडणुक प्रभारी आणि सह प्रभारींची घोषणा केली आहे आणि लवकरच गोव्यासाठी नियुक्तींची घोषणा केली जाईल.

भाजप एनडीए आघाडीतील आपला सर्वांत जुना मित्र पक्ष अकाली दल केंद्रिय कृषी कायद्यांवरील मतभेदानंतर वेगळ्या झाल्यानंतर पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवेल. पंजाबला वगळता उर्वरीत चार राज्यांमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे आणि या चारही राज्यांमध्ये दुसर्‍यांदा सत्ता मिळविण्यासाठी ते कोणतीही कमी ठेवणार नाहीत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!