इंग्लंडमध्ये टी20 आणि वनडे सीरीज खेळणार टीम इंडिया

नवी दिल्ली,

इंग्लंडचा पराभव करत कसोटी मालिका जिंकणार्‍या भारतीय संघासाठी पुढचं आव्हान तयार आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंडला एक सीरीज खेळणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड ने 2022 च्या दौर्‍याची घोषणा केली आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच दिवसांची टेस्ट सिरीज खेळत आहे. ज्यातील पाचवा आणि शेवटचा सामना 10 सप्टेंबरला मैनचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टेस्ट क्रिकेट आणि वनडे, टी-20 मध्ये विभागणी करण्यात आली आहे.

इंग्लंडचा संघ जुलै महिन्यात भारताविरुद्ध वनडे, टी-20 सिरीज खेळणार त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. एण्ँच्या माहितीनुसार भारतीय दौर्‍याची सुरूवात 1 जुलैला ओल्ड ट्रैफर्डला टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याने सुरूवात होईल. उरलेले दोन टी 20 सामने ट्रेंटबि-ज (3 जुलै) आणि एजियस बाऊल (6 जुलै) ला खेळवण्यात येणार आहे.

यानंतर तीन वनडे मॅचची सीरीज एजबास्टन (09 जुलै), ओवल (12 जुलै) और लार्ड (14 जुलै येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरिजची सुरुवात दोन जूनपासून लॉर्डस येथे करेल आणि इतर दोन टेस्ट ट्रेंटबि-ज (10-14 जून) आणि हैडिंग्ले (23-27 जून) येथे खेळवण्यात येणार आहे.

भारताच्या 2022 मधील इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक

टी20 सीरीज-

पहिला टी20: एक जुलै, ओल्ड ट्रैफर्ड

दुसरा टी20: तीन जुलै, ट्रेंट बि-ज

तिसरा टी20: सहा जुलै, एजियस बाउल

वनडे सीरीज-

पहिला वनडे: 09 जुलै, एजबास्टन

दुसरा वनडे: 12 जुलै, ओवल

तिसरा वनडे: 14 जुलै, लार्ड

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!