कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वर्ष 2000 मधील ऑस्ट्रेलिया संघा सारखा आहे – हार्मिसन

नवी दिल्ली,

वर्तमान कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ हा वर्ष 2000 मधील ऑस्ट्रेलियाई क्रिकेट संघा सारखा आहे असे मत इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज स्टिव्ह हार्मिसने व्यक्त केले.

भारतीय क्रिकेट संघाने इंगलंडच्या विरुध्द सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना जिंकून 2-1 ने आघाडी घेतली आहे. ओव्हल मैदानावर 50 वर्षानंतर मिळालेल्या या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाची सर्वत्र प्रशवंसा केली जात आहे.

ईएसपीएन क्रिकइंफो मॅच डे कार्यक्रमामध्ये विशेषतज्ञ म्हणून उपस्थित असलेला इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हार्मिसननेेही भारतीय संघाची जोरदार प्रशवंसा केली.

त्यांने म्हटले की दबावाच्या स्थितीमध्येही भारत विरोधी संघापेक्षा खूप पुढे आहे. विशेष करुन पाचव्या दिवशी हा संघ काही वेगळ्या पध्दतीनेच खेळतो आहे. हा संघा काही प्रमाणात अशा पध्दतीचा आहे जसे की वर्ष 2000 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ असायचा. जो कोणत्याही संघाला पराभूत करत असे. मी आणि व्हिव्हीएस लक्ष्मणही या संघाच्या विरुध्द खेळलो आहोत. हा भारतीय संघ त्या ऑस्ट्रेलिया संघा सारखाच विरुध्द स्थितीमध्ये वापसी करत सामना जिंकण्याची ताकद ठेवतो आहे.

मागील तीन वर्षात जर आपण भारतीय संघाच्या प्रदर्शनावर नजर टाकली तर या दरम्यान भारताने 29 कसोटी सामने खेळले आहेत आणि यातील त्यांनी 18 सामन्यात विजय मिळविला आहे तर आठ सामन्यात पराभवाचा सामना केला व तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. या दरम्यान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाउन ऑस्ट्रेलिया विरुध्द दोन कसोटी मालिकाही जिंकल्या आहेत.

याच कार्यक्रमात भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हीएस लक्ष्मणने हार्मिसनच्या मताला समर्थन दिले आणि याच बरोबर लक्ष्मणने या संघाच्या ताकदी मागील उत्कृष्ट बेंच स्ट्रेंथला सांगितले.

लक्ष्मणने म्हटले की या संघात अनेक असे खेळाडू आहेत जे सध्या बेंचवर बसलेले आहेत परंतु त्यांच्यामध्येही प्रतिभेची कोणतीही कमी नाही. हेच कारण आहे की कोणताही खेळाडू कोणत्याही कारणामुळे खेळू शकला नाही तर या सघाकडे त्यांच्या जागी उत्कृष्ट रिप्लेमेंटही उपस्थित आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!