युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी कोल इंडिया लिमिटेडनचे 75 कोटी रुपयांचे योगदान
नवी दिल्ली,
प्रमुख वैशिष्ट्ये :
भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि कोल इंडिया यांनी संयुक्तपणे क्रीडा अकादमी सुरू करावी : अनुराग ठाकूर
सीआयएलकडून पुरविला जाणारा निधी काळजीपूर्वक वापरला जाईल आणि ठराविक काळातच प्रकल्प पूर्ण केला जाईल : निशीथ प्रामाणिक
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (र्एइ) विभागाच्या वतीने कोल इंडिया लिमिटडेसह केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. कार्पोरेट सामाजिक जबाबदारीतील दायित्त्वाचा भाग म्हणून (ण्एीं) सीआयएलच्या वतीने 75 कोटी रुपये योगदानासाठी हा करार झाला आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, क्रीडा विभागाचे सचिव रवी मित्तल आणि कोल इंडिया लिमिटेडचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
भाषणा दरम्यान, अनुराग ठाकूर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ऑॅलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंनी केलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर कोल इंडियाकडून एनएसडीएफसाठी अतिशय योग्यवेळी मौल्यवान योगदान देण्यात आले आहे. पॅरालिम्पिक्समध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आणि टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये 19 पदके कमावल्याबद्दल त्यांनी भारतीय अथलिटसचे अभिनंदन केले. अधिक माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, हा निधी राष्ट्रीय आणि आंतारराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आणि विशिष्ट क्रीडा शाखांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातो.
ठअथलिटसना लाभ मिळावा, अशा दृष्टीने एसएआय आणि एनएलआयपीई अंतर्गत असलेल्या क्रीडा अकादमींना अधिक वसतिगृहांची गरज आहे. क्रीडापटूंसाठी बंगळूर, भोपाळ आणि एलएनआयपीई ग्वाल्हेर येथे तीन वसतिगृहांच्या बांधकामांसाठी 75 कोटी रुपयांच्या भरीव निधीचे योगदान देण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडच्या प्रयत्नांमुळे प्रशिक्षणात सुलभता आणि सुधारित सुविधा उपलब्ध होऊ शकतील,‘ ठाकूर यांनी नमूद केले.
देशातील क्रीडा संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि कोल इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तरित्या क्रीडा अकादमी उभारावी, असा प्रस्ताव मंत्र्यांनी यानिमित्ताने मांडला.
ठाकूर यांनी सर्व पीएसयू, कॉर्पोरेटस आणि व्यक्तींना आवाहन केले आहे की, त्यांनी पुढे यावे आणि त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून एनएसडीएफमध्ये उदारपणे योगदान द्यावे आणि क्रीडा शक्ती बनण्याच्या भारताच्या प्रवासात भागधारक व्हावे.
भाषणा दरम्यान, निशित प्रामाणिक यांनी अश्वासन दिले की, सीआयएलकडून पुरविला गेलेला निधी हा काळजीपूर्वक पद्धतीने वापरला जाईल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.
एनएसडीएफसाठी केले जाणारे योगदान हे प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँका यांच्या माध्यमातून होत असते. 31.03.2021 पर्यंत एकूण सीएसआर योगदान हे 170 कोटी रुपये आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने त्यात आपला 164 कोटी रुपये इतका वाटा दिला आहे.