पश्चिम बंगालच्या काही भागांत वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मदत जाहीर
नवी दिल्ली, 7 जून 2021
पश्चिम बंगालच्या काही भागांत वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“पश्चिम बंगालच्या काही भागांत वीज कोसळल्याने जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि परिजनांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो.” असे पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.