कोरोनाचे संकट कायम; गेल्या 24 तासात 42 हजार रुग्णांची भर तर 308 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली,

देशात कोरोनाची तिसरी लाट कधीही येण्याची शक्यता असताना अद्याप दुसरी लाट ओसरल्याचं दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 42,766 नव्या रुग्णांची भर पडली असून 308 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 38,901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी देशात 42, 618 कोरोनाचे रुग्ण सापडले होते.

देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 29,682 रुग्णांची भर पडली आहे. तसेच 142 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत केरळमध्ये 41 लाख 81 हजार 137 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 29 लाख 88 हजार 673

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 21 लाख 38 हजार 92

सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : चार लाख 10 हजार 48

एकूण मृत्यू : चार लाख 40 हजार 533

एकूण लसीकरण : 68 कोटी 46 लाख 69 हजार डोस

राज्यातील स्थिती

राज्यात काल 4,130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 88 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 02 टक्के आहे.

राज्यात काल 64 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 025 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 469 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (68), नंदूरबार (1), धुळे (09), जालना (27), परभणी (55), हिंगोली (60), नांदेड (25), अमरावती (96), अकोला (17), वाशिम (4), बुलढाणा (73), यवतमाळ (12), नागपूर (55), वर्धा (3), भंडारा (4), गोंदिया (5), गडचिरोली (34) या 17 जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 416 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 416 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 382 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3561 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1379 दिवसांवर गेला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!