आयुष मंत्रालयाने आज देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून ‘आयुष आपके द्वार‘ ही मोहीम सुरू केली
नवी दिल्ली
आयुष मंत्रालयाने आज देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून ‘आयुष आपके द्वार‘ ही मोहीम सुरू केली. आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचार्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करून आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी डॉ.मुंजापारा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि औषधी वनस्पती दत्तक घेण्याचे आणि कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
आजच्या उद्घाटन समारंभात एकूण 21 राज्ये सहभागी होत असून 2 लाखांहून अधिक रोपे वितरित केली जातील. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल हे मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. एका वर्षात देशभरातील 75 लाख कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेलगुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग-ास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब-ाह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे.
आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, आयुषचे विशेष सचिव पी.के. पाठक, आयुषचे सहसचिव डी सेंथिल पांडियन आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, वाय -ब-ेक अॅपचा शुभारंभ , रोगप्रतिबंधक आयुष औषधांचे वितरण यासह इतर अनेक कार्यक्रम याआधीच सुरू करण्यात आले आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला उद्या आयोजित केली जाईल आणि 5 सप्टेंबर रोजी ध-इीशरज्ञ अॅपवरील वेबिनार आयोजित केले जाणार आहे.