सज्जन कुमारची अंतरिम जमानत याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली,

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 1984 मधील शिख विरोधी दंगलीतील दोषी आणि काँग-ेसचे माजी नेते सज्जन कुमारद्वारा वैद्यकिय आधारावर मागितलेल्या जमानत याचिकेला फेटळले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षते खालील पीठाने सज्जन कुमार यांच्या वकिलाला सांगितले की त्यांच्यावर जघन्य गुंन्हेगारी आरोप आहेत. तुम्हांला वाटते की त्यांच्या बरोबर कोणत्याही सुपर व्हीआयपी रुग्णा सारखे व्यवहार केला जावा.

सज्जन कुमार यांच्यावतीने वरिष्ठ वकिल रंजीत कुमार यांनी पीठा समोर बाजू मांडली की त्यांच्या पक्षकाराची तबीयत बिघडत आहे आणि त्यांचे वजनही खूप कमी झाले आहे. कुमार यांचे वकिल रंजीत यांनी एका डॉक्टरांद्वारा त्यांच्या आरोग्यावरील एका अहवालाचा हवाला दिला.

मात्र पीठातील न्यायमूर्ती एम.एम.सुंदरेश यांनी सज्जन कुमारांच्या या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. यात त्यांनी आपल्या आरोग्याशी संबंधीत मुद्दांवर उपचार करण्यासाठी त्यांना मेदांता रुग्णालयात स्थानांतरीत करण्याची मागणी करण्यात आली होती.

सज्जन कुमारांच्या वकिलांनी म्हटले की ते स्वत: खर्च वहन करतील त्यांना पोटाशी संबंधीत खूप गंभीर गुंतागुंत आहे आणि त्यांचे वजन खूप कमी झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकिय बोर्डद्वारा सादर अहवालावर विचार केला. यात सांगण्यात आले होते की त्यांंच्या आरोग्यात सुधार होत आहे.

वैद्यकिय आधारावर अंतरिम जमानतीला फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की ते कोणताही आदेश मंजूर करण्यास इच्छुक नाहीत आणि जर वैद्यकिय अधिका-यांना वाटत आहे की मेदांतामध्ये त्यांची तपासणीची जरुरी आहे तर ते यासह पुढे जाऊ शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑगस्टला सीबीआयला 1984 मधील शिख विरोधी दंगलीच्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेले सज्जन कुमारांच्या वैद्यकिय स्थितीला दुजोरा देण्याचे निर्देश दिले होते. सज्जन यांनी आरोग्य कारणांचा हवाला देत अंतरिम जमानत मागितली होती.

पीठाने कुमारांच्या याचिकेवर सीबीआयकडून उत्तर मागविले आणि तपास संस्थेला एक आठवडयाच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!