टीम इंडियाचं दमदार कमबॅक; इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत
नवी दिल्ली,
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी ओव्हल येथे खेळवला जात आहे. आज कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव काल अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून फक्त शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. शार्दुलने 36 बॉलमध्ये तीन षटकार आणि सात चौकार मारत 57 धावा केल्या. या शिवाय कर्णधार विराट कोहलीने 50 धावा केल्या. तर दुरीकडे इंग्लंडच्या क्रिस व-ोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतले तर ओली रॉबिन्सननी तीन विकेट घेतले.
सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असून इंग्लंडने पाच विकेट गमावले आहे. 34 ओव्हरनंतर इंग्लंडने पाच विकेट गमावत 119 धावा केल्या आहेत. नाबाद जॉनी बेयरस्टोनो 26 आणि ओली पोपने 29 धावा केल्या करत अर्धशतकाची भागीदारी केली . 25 व्या ओव्हरला तिसर्या चेंडूला उमेश यादवने बर्थडे बॉय डेविड मलान 31 धावा करत आऊट झाला. मलान आज वाढदिवस आहे.
भारताचा पहिला डाव
भारताकडून फक्त शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. शार्दुलने 36 बॉलमध्ये तीन षटकार आणि सात चौकार मारत 57 धावा केल्या. या शिवाय कर्णधार विराट कोहलीने 50 धावा केल्या. तर दुरीकडे इंग्लंडच्या क्रिस व-ोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतले तर ओली रॉबिन्सननी तीन विकेट घेतले. टॉस हरल्यानंतर प्रथम टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली परंतु सुरुवातीलाच कामगिरी चांगली नव्हती. तर तिसर्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा आज 4 धावा करत तंबूत परतला. रोहितने 27 बॉलमध्ये एक चौकरासह 11 धावा केल्या तर केएल राहुलने 44 बॉलमध्ये तीन चौकरासह 17 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने 31 बॉलमध्ये एका चौकारसह चार धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहली 96 बॉलमध्ये आठ चौकारासह 50 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 23,000 धावा करणारा फलंदाज बनला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत होता. त्यानंतर भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यात 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. तर तिसर्या कसोटी भारताने 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडीसाछी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.