तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली,

तालिबानी प्रतिनिधीची भारतीय राजदुताने भेट घेतल्याने एआयएमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी हे संतप्त झाले आहेत. तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टिवट करत तालिबान की हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तालिबानला भारत दहशतवादी संघटना मानते की नाही? ओवैसे यांनी निवडणुकीबाबतही भाष्य केले आहे. 7 सप्टेंबरला फैजाबादला, 8 सप्टेंबरला सुलतानपूर आणि 9 सप्टेंबरला बाराबंकीला जाणार असल्याचे ओवैसी यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत योगी सरकारला पराभूत करण्यासाठी येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी दौरे करण्यात येणार असल्याची माहिती एआयएमआयएमच्या अध्यक्षांनी दिली.

दोहामध्ये तालिबानचे प्रतिनिधी आणि भारतीय राजदुतांची भेट

भारत प्रथमच अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेल्या तालिबानच्या संपर्कात आला आहे. कतारमधील भारतीय राजदुत दीपक मित्तल हे तालिबानच्या दोहा कार्यालयाचे प्रतिनिधी शेर मोहम्मद अब्बास स्टॅनकेझाई यांना भारतीय दुतावास कार्यालयात 31 ऑॅगस्टला भेटले आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून 31 ऑॅगस्टला संपूर्ण सैन्य काढून घेतले आहे. तालिबानच्यावतीने विनंती करण्यात आल्याने भारतीय राजदूत हे भेटल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

तालिबानी आणि भारतामध्ये ही झाली चर्चा-

दोघांमध्ये सुरक्षा, सुरक्षितता आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. ज्या अफगाणिस्तानी भारतीयांना भारतात परत येण्याची इच्छा आहे, त्यांच्याबाबतही चर्चा झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानची जमीन हे भारताविरोधात तसेच दहशतवादासाठी कोणत्याही परिस्थितीत वापरू नये, असे भारतीय राजदूताने तालिबानच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!